पायरीवरून ट्रॅक्टर गेल्याने हात छाटले; तिघांना ३ दिवस कोठडी

Foto
पायरीवरून ट्रॅक्टर गेल्याने हात छाटले; तिघांना ३ दिवस कोठडी
कन्नड, (प्रतिनिधी) : ट्रॅक्टरचे चाक घराच्या पायरीवरून गेल्याचा राग आल्याने एकाचा कोयत्याने डावा हात छाटल्याची घटना मुंडवाडी तांडा येथे घडली. या प्रकरणी तीन आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुंडवाडी तांडा येथे रस्त्याने जात असताना शनिवारी (ता. २८) रोजी दुपारी ट्रॅक्टरचे चाक घराच्या पायरीवरून गेले. याचा राग अनावर झाल्याने किरण राजू राठोड (वय २२) याने कोयत्याने रोहिदास राठोड (वय ४५) यांच्यावर कोयत्याने
हल्ला चढवला. त्यांचा डावा हात मनगटापासून छाटला. या प्रकरणी तीन आरोपीविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना अटक करून रविवारी कन्नड न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि. रामचंद्र पवार यांनी सांगितले की, मुंडवाडी तांडा येथील भैय्या राठोड (वय ३१) यांच्याकडे ट्रॅक्टर आहे. ते शेतात जात असताना राजू राठोड (वय ४५) यांच्या घराच्या पायरीवरून ट्रॅक्टरचे एक चाक गेले. याचा
राग आल्याने राजू राठोड, विजय राठोड, उत्तम राठोड, विष्णू राठोड, किरण राठोड, आदेश राठोड यांनी भैय्या राठोड यांना तू आमच्या घरासमोरून ट्रॅक्टर का नेतो? असे म्हणत कुन्हाडीने मारहाण करण्यास सुरुवात केली. ट्रॅक्टरचालक भय्या राठोड यांचे वडील रोहिदास राठोड यांनी मध्यस्ती केली. या वेळी किरण राठोडने कोयत्याने हल्ला चढवला. भय्या राठोड यांनी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जखमी रोहिदास यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions